माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो तृणमुलमध्ये दाखल

कोलकाता वृत्तसंस्था | माजी केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी आज तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.

बाबुल सुप्रियो यांनी दोन महिन्यांपूर्वी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिल्याचे मानले जात होते.

बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवरून राजकीय संन्यासाबाबत भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या होत्या. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अलविदा मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, कॉंग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटलं होतं. मात्र, आता त्यांनी थेट तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

 

Protected Content