जळगाव प्रतिनिधी । न्यायालयात दिलेला जबाब मागे घेण्यासाठी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्यासह १५ ते २० जणांच्या टोळक्याने एका १३ वर्षीय पिडीत मुलीसह तीच्या आईस जीवेठार मारण्याची धमकी दिली. आज गुरुवार ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता बसस्थानक परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अहमद नगरातील श्रीरामपुर येथील १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुरुवारी भुसावळ न्यायालयात पिडीत मुलीचा जबाब नोंदवण्यात आला. न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर पिडीत मुलगी व तीची आई जळगावात नवीन बसस्थानकावर आले होते. रिक्षाची वाट पाहत असताना तेथे पारस ललावाणी व १५ ते २० जणांचा जमाव आला. न्यायालयात दिलेला जबाब माघे घ्या नाहीतर जीवंत सोडणार नाही. अशी धमकी ललवाणी याने पिडीत मुलगी व तीच्या आईला दिली. या घटनेनंतर महिलेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार ललवाणी याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/291183942381048