खिर्डी ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खिर्डी येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सरपंच राहुल फालक यांच्याहस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.

याप्रसंगी सरपंच राहुल फालक यांच्यासह गावातील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत नानासाहेब गोरड, ऋषिकेश मंगळे, निखिल कुलट, जयेश कानडजे, अनिकेत मंडले, रूपेश अकुलेटी देखील उपस्थित होते. यानिमित्ताने सरपंच राहुल फालक यांनी महात्मा गांधजींच्या  प्रतिमेची पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ केला., तसेच गांधी जयंती हा दिन “अहिंसा दिन” म्हणून देखील साजरा केला जातो. लोकांना अहिंसेची व स्वच्छतेची शिकवण दिली, अशा बापूजींच्या कार्याची व बलिदानाची कृतज्ञता बाळगण्यासाठी कृषीदुत यांनी “स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम 2023 – 2024  या साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. देशमुख व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Protected Content