मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मैत्रेय कंपनीची मालमत्ता विकून गुंतवणुकदारांना पैसे परत मिळावेत व फरार आलेल्या मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी मैत्रेय कंपनीतील मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने महात्मा गांधी उद्यानासामोर सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महाराष्ट्रासह देशातील २ कोटी १६ लाख ग्राहकांचे मैत्रीय सर्व्हिसेस प्रा.लि., मैत्रेय प्लॉटर्स अॅण्ड स्ट्रक्चरर्स, मैत्री रियल्टर अॅण्ड कन्स्ट्रक्शन, मैत्री सुवर्णसंधी या चार कंपन्यांमध्ये तब्बल २६०० कोटी रुपये अडकून आहेत. फेब्रुवारी २०१६ पासून कंपनीवर गुन्हे दाखल होऊन कंपनी बंद झालेली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणाचे कामकाज संथ गतिने सुरू असल्यामुळे मैत्रेय प्रॉपर्टी विक्री संदर्भात कोर्ट आदेश लवकरात लवकर मिळण्यासाठी विलंब होत आहे. शासनाने याकडे आपल्या वतीने संबंधित अधिकारी यांना कामाकाजात लक्ष देवून कार्यवाही गतिमान करण्यात यावी  व सदर प्रॉपर्टी विक्रीचे आदेश कोर्टाकडून प्राप्त करून घ्यावे या मागणीसाठी मैत्रेय कंपनीतील मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील महात्मा गांधी उद्यानासमोर सोमवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी मैत्रेय कंपनीतील मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष सुरेश सपकाळे, निलेश वाणी, खजिनदार मंगल परदेशी, नानासाहेब पाटील, यासीन सैय्यद, प्रदीप शिसोदे, अशोक चौधरी, पांडूरंग बंडगर, बाबुराव घुले, सुभाष पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content