माजी नगरसेवकाचा महागडा मोबाईल लांबविला

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील माजी नगरसेवकाचा ८० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेल्याची घटना शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट येथे उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात परप्रांतीय चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र झिपरू पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनीवारी २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता राजेंद्र पाटील हे शहरातील कृषी उत्पन्न बाजारी समितीमधील भाजीपाला मार्केट येथे आलेले होते. त्यावेळी मार्केटमध्ये आलेल्या संशयित महिला लल्ली रमजान जोगी वय २७, पुजा रज्जू जोगी दोन्ही राहणार अमठी उत्तर प्रदेश ह.मु.ममता बेकरी जळगाव आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी महिला यांनी राजेंद्र पाटील यांचा ८० हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल चोरून नेला. ही घटना घडल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून या महिलांविरोधात सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.

Protected Content