जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथे जुन्या वादातून एका तरूणाला तीन जणांनी शिवीगाळी करत चाकूने वार करून दुखापत केली तर इतरांनी मोठा दगड पायावर टाकल्याने पाय फ्रॅक्टर केल्याची घटना २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ मे रोजी दुपारी ४.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, गजानन विकास बाविस्कर वय ३० रा. छत्रपती शिवाजी नगर, हुडको, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून खासगी कंपनीत नोकरीला आहे. २३ मे रोजी रात्री ९.३० वाजता जुन्या वादातून मनिष रामू बिऱ्हाडे, संगम देवा भोई आणि क्रिष्णा पांडूरंग सोनवणे सर्व राहणार जळगाव यांनी शिवीगाळ करत चाकूने गजानन बाविस्कर याच्या डोक्यावर व हातावर वार केले. तर इतरांनी त्यांच्या छातीवर आणि पायावर दगड टाकून पाय फ्रॅक्चर केला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले. जखमीला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गजानन बाविस्करी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.