Home राजकीय भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
176


Vijay Ghodmare Sharad Pawar
 

नागपूर (वृत्तसंस्था) हिंगणा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

 

नागपुरातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विजय घोडमारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नुकतीच भेट घेतली होती. विजय घोडमारे 2009 मध्ये नागपुरातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र 2014 मधील विधानसभा निवडणुकांच्या वेळी विजय घोडमारे यांना उमेदवारी नाकारली होती. तेव्हापासून घोडमारे नाराज होते. दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता नसल्यामुळे विजय घोडमारे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून या मतदार संघात पुन्हा विद्यमान आमदार समीर मेघे यांनाच तिकीट मिळणार आहे.


Protected Content

Play sound