सौदीतील सगळ्यात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला

157075 620

रियाध, वृत्तसंस्था | जगातल्या सर्वाधिक श्रीमंत तेल कंपन्यांपैकी एक अशी ओळख असलेली सौदी अरेबियातील ‘अरामको’ कंपनीच्या दोन फॅसिलीटी केंद्रांना शनिवारी सकाळी आग लागली. या केंद्रांवर ड्रोन हल्ले झाल्याने ही आग लागल्याची माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे.

 

मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘पहाटे ४.०० वाजता औद्योगिक सुरक्षा बलाच्या सैनिकांनी गोळीबाराचे प्रत्युत्तर दिले. अबकेक आणि खुराइस येथील फॅसिलीटी सेंटर्सवर ड्रोन हल्ला झाला होता.’

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान, मंत्रालयाने कळवले आहे की, देशातील पूर्वेकडील भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यांची चौकशी सुरू आहे. हे कोणाचे कारस्थान आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. मागील महिन्यातही ‘अरामको’च्या नॅचरल गॅसच्या फॅसिलिटी सेंटरवर हल्ला झाला होता, मात्र यात जीवितहानी झाली नव्हती. यमनच्या हूथी विद्रोही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

Protected Content