अवैध गावठी दारूभट्ट्यांवर वनविभागाची धडक कारवाई

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील वनपरिक्षेत्र चोपडा अंतर्गत पिपऱ्यापानी नाला परिसरामध्ये अवैध दारु हातभट्टीवर अचानक धाड टाकून तेथील १ हजार लिटर दारूचे कच्चे रसायन व दारू पाडण्याचे साहित्य असे ऐकून अंदाजे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. सदरचे घटनेचा वनगुन्हा नोंदवला असुन आरोपींचा शोध सुरु आहे.

वनसंरक्षक धुळे वनवृत्त निनु सोमराज, उप वनसंरक्षक जमीर शेख, राजेंद्र सदगिरयांचे मार्गदर्शनाखाली. चोपडा येथील सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, बी.के.थोरात (वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा) यांचे प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी वनपाल आर.एस.मोरे, जे.पी.सूर्यवंशी,पी.ए. सोनवणे, वनरक्षक सीमा भालेराव. सरला भोई सोनाली पावरा, उज्वला बारेला, अनिता पिंकी कोठारी, शालिग्राम कंखरे, रोहित पावरा, संदीप पावरा, जनार्दन गुट्टे, ओमल पाटील, प्रवीण बागुल, शुभम पाटील, प्रकाश पाटील, वनसेवक भुरसिंग पावरा, रतिलाल भिल, रवी भिल, विकी राजपूत, वाहन चालक गोविंदा चौधरी, मनोज मोरे इ. कर्मचारी कारवाईत सहभागी होते.

Protected Content