पिकअप वाहनावर दगडमारून व्यावसायिकाचा मोबाईलची जबरी चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभूमी जवळ पिकअप वाहनाला दगड मारून काच फोडून व्यावसायिकाच्या हातातील ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून दिल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी ३१ जुलै रोजी रात्री १० वाजता अज्ञात चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कासीम अब्दुल रहीम खाटीक (वय-४४, रा. रामनगर एमआयडीसी जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेळ्या आणि बोकड खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. मंगळवारी ३० जुलै रोजी रात्री ११.३० वाजता त्यांच्या (एमएच ५०, ५२२०) या पिकअप वाहनाने कासीम अब्दुल खाटीक हे जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभूमी परिसरातून जात असताना अज्ञात ४ जणांनी त्यांच्या वाहनावर दगड मारून काच फोडून हातातून ७ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी ३१ जुलै रोजी रात्री १० वाजता कासिम अब्दुल खाटीक यांनी जळगाव शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील पाटील करीत आहे.

Protected Content