जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासनाकडे सातत्याने न्याय मागण्यासाठी पाठपुरावा केला असतानाही शासन दुर्लक्ष करीत असल्याने कोरोना योद्ध्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची पहिल्या टप्यात गुरुवार दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे.
पद्मालय शासकीय विश्रामगृह येथे जिल्हयातील कोरोना योद्ध्यांची बैठक पार पडली.या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, कोरोना महामारीच्या जागतिक संकटात नागरिकांच्या जिविताचे संरक्षण करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही सूचना न देता कामावरून कमी करण्याच्या निर्णय अन्यायकारक आहे.विविध शासकीय कार्यालयात रिक्त असलेल्या जागांवर कोरोना योद्ध्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाला घेण्यास भाग पाडण्याची वेळ आली आहे.
संविधान जागर समितीचे भारत ससाणे यांनी आपले विचार व्यक्त करताना कोरोना योद्ध्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या जीविताचे संरक्षण केले आहे. कोरोनाचे निर्मूलन करण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोविड रुग्णालयात स्वतःला समर्पित केल्याने त्यांना न्याय देण्यासाठी प्रखर आंदोलन छेडण्याची वेळ आली आहे.
हरिश्चंद्र सोनवणे यांनी कोरोना योद्ध्यांच्या हक्क व अधिकाराबाबत मागील दोन सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन निलेश बोरा यांनी केले.यावेळी दिलीप सपकाळे,वाल्मीक सपकाळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.बैठकीत भाग्यश्री चौधरी,मधुकर शिरसाळे,वैभव देशपांडे, सागर वानखेडे,मनोज पाटील, सुरेश भालेराव, पुजा माळी,अक्षय जगताप,विवेक माळी,वैभव गायकवाड,विक्की पाटील,शिवानी दाभाडे,प्रकाश मडावी,हर्षल देवकर,सागर चौधरी,पल्लवी गवई,अनिल महाजन, मिलिंद जंजाळे,धनलाल चव्हाण, सपना ठाकरे,निखिल पाटील, ऐश्वर्या सपकाळे,प्रतिक्षा सोनवणे, रामकृष्ण सपकाळे, मयूर तायडे, अविनाश चौधरी,किरण जाधव, वर्षा जाधव, धिरजकुमार राठोड, भाग्येश पाटील,हर्षाली तायडे यांचेसह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कोरोना योद्धा यांची उपस्थिती होती.