अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील फरशी रोड बोरी नदी काठी राहत असलेल्या तरूणासह त्यांच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली तर तरूणाला लोखंडी रॉडने तोंडावर मारहाण केल्याने गंभीर दुखापत केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष श्रावण बिऱ्हाडे वय ४० रा. फरशी रोड बोरी नदी काठी, अमळनेर हा तरूण आपल्या आई व पत्नीसह वास्तव्याला आहे. नगरपालिकेत सफाई कर्मचारी आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरसमोर काही तरूण भांडण एकमेकांना शिवीगाळ करत होते. त्यावेळी संतोष बिऱ्हाडे यांनी सांगितले की आमच्या घरात महिला घरात आहे, तुम्ही विनाकारण येथे शिवीगाळ करून नका, असे सांगितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी अब्दुल रहीम बेलदार, मुन्ना इलीयास खाटीक, तोसीफ ताहेर बेलदार, सलमान बाबा फकीर उर्फ फुट्या, आणि मुंज्या पुर्ण नाव माहिती नाही सर्व रा. बेलदार मोहल्ला यांनी संतोष बिऱ्हाडे याला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.
हे पाहून संतोष यांची आई भांडण सोडविण्यासाठी आली असता त्यांना देखील शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, एकाने रिक्षातून लोखंडी रॉड काढून संतोष याला मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी संतोष बिऱ्हाडे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता मारहाण करणारे अब्दुल रहीम बेलदार, मुन्ना इलीयास खाटीक, तोसीफ ताहेर बेलदार, सलमान बाबा फकीर उर्फ फुट्या, आणि मुंज्या पुर्ण नाव माहिती नाही सर्व रा. बेलदार मोहल्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप हे करीत आहे.