Home Uncategorized फैजपूरात बेस संस्थेतर्फे गरजूंना अन्नदान

फैजपूरात बेस संस्थेतर्फे गरजूंना अन्नदान


फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । भक्तिवेदांत अकॅडमी सायंटिफिक एज्युकेशन अर्थात बेस या संस्थेमार्फत ” चैतन्य थाली” उपक्रमाअंतर्गत गरीब व गरजू नागरीक व  कोरोनाबाधितांना सात्विक अन्नदान करण्यात आले.

अन्न ,वस्त्र व निवारा या  मानवाच्या मूलभूत गरजा आहे. त्यात अन्न अति महत्त्वाची गरज आहे. कोरोना काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या वंचित लोकांसाठी, ज्या या लोकांचे पोट हातावर असते, जे रोजंदारीवर काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते या गरजू लोकांसाठी आम्ही “चैतन्य थाली,” उपक्रमा अंतर्गत अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हर्षल अमृत सैदाणे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जयेश वाघंबरे, प्रतिभाताई पाटील, गिरीश जावळे, दीपक मेहरानी, जयेश सरोदे, हीरल मेहरानी हे सर्व मान्यवर उपस्थित होते.


Protected Content

Play sound