फैजूपरात उपकामगार कार्यालय सुरू करा; गवंडी कामगार संघटनेचे निवेदन

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । इंजिनीअर सही शिक्के देत नाही, त्यामुळे खरे गवंडी कामगार शासनाच्या लाभापासून वंचित राहत आहे. शासनाने फैजपूर येथे उपविभागीय कामगार कार्यालय सुरू करावे अशी, मागणी गवंडी कामगार संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कैलास कडलक यांना निवेदन देण्यात आले.

गवंडी कामगार संघटना तथा एम मुसा जनविकास सोसायटी व असंघटीत गवंडी कामगार संघटना अध्यक्ष शाकीर मलिक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, आमदार शिरीष चौधरी यांना निवेदनाद्वारे  केली आहे. 

निवेनात नमूद करण्यात आले की, गेल्या पंधरा महिन्यापासून रावेर आणि यावल तालुक्यातील ईमारत बांधकाम कामगार वर्गाच्या नूतनीकरण व नोंदणी  लाभाचे कोणतेही कामे होत नाही. यासाठी जळगाव येथील कामगार कार्यालयामध्ये उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. यामुळे कामगार  हैराण झाले आहे. तुमची नोंदणी आनलाईन झाली आहे, तुमच्या मोबाईलवर मेसेजेस येतील, मात्र कामगाराच्या नूतनीकरणाचे काम अद्यापपर्यंत झालेले नाही. तर दुसरी बाजू म्हणजे बांधकाम अभियंता इंजिनिअरच्या सही शिक्केसाठी कामगारांना भटकंती करावी लागत आहे. ईमारत बांधकाम कामगारला नूतनीकरण व नोंदणीसाठी इंजिनिअरचे सही शिक्के लागत आहे. तरी पण इतर कामगार, प्लम्बर, पेंटर, सुतार, वेल्डर, हमाल, महिला कामगार साठी सुध्दा इंजिनिअरचे शिके लागत आहे. 

इंजिनिअरकडून खऱ्या गवंडी कामगारांना डावलण्यात येत आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. बरेच कामगार अशिक्षित आणि अज्ञानी असल्याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन तो लावण्यात येते. हा कामगारांवर अन्याय होत आहे. तरी इतर कामगार प्लम्बर, पेंटर, सुतार, महिला कामगार वर्गाच्या नोंदणीसाठी जे दुकानदाराचे जीएसटी इन्कमटेक्स भरत आहे. त्याचे बिल व जीएसटी नंबरवर कामगार म्हणून मान्यता देण्यात यावी. रावेर यावल तालुक्यात  आदिवासी समाज व मजुर जास्त प्रमाणात आहे. त्यांना लिहिता-वाचता येत नसून प्रत्येकवेळी कामे सोडून जळगाव कामगार कार्यालयात येण्याजाण्यासाठी ४००-५०० रूपये खर्च करून परत रिकामे हाती यावे लागते.  

शासनाने मुक्ताईनगर, रावेर, यावल तालुक्यातील कामगारांसाठी फैजपूर येथे ईमारत कामगार उप कार्यालय लवकर सुरू करावे अशी मागणी एम मुसा जनविकास सोसायटी व असघटित गवंडी कामगार संघटना अध्यक्ष, भारतीय कामगार संघटना मुबंईचे रावेर यावल तालुका अध्यक्ष मलिक शाकिर व सर्व कामगारांनी शासन दरबारी केली आहे.  फैजपूर येथे कामगार वर्गाच्या मागणीचे हे निवेदन फैजपूर उपविभागीय कार्यालयामध्ये देण्यात आले. यावेळी शेख इरफान, इस्माईल उपाध्यक्ष करीम नथु तडवी सहित कामगार उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!