पहिल्या दिवशी अयोध्येत दर्शनासाठी भाविकांचा महापूर

अयोध्या-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांचा महापूर लोटला आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी अयोध्या नगरी गजबजली आहे. गर्दी हाताळताना मंदिर व्यवस्थापनाला मोठ्या अडचणी येत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते रामललावर अभिषेक करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आठ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

रामललाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव संजय प्रसाद आणि कायदा व सुव्यवस्था महासंचालक प्रशांत कुमार स्वतः गर्भगृहात उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेतला. रामललाचे सहज दर्शन करता यावे साठी पोलीस आणि प्रशासन सतर्क आहे.

अयोध्येत गर्दी वाढल्याने आजबाजुच्या जिल्ह्यातील पोलीस देखील अलर्ट झाले आहेत. त्यांनी भाविकांना अयोध्येत लगेचच न जाण्याचे आवाहन केले आहे. कारण आतापर्यंत तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले असून अजून बरेच लोकं अयोध्येत दाखल झाले आहेत. बाराबंकी पोलिसांनी गाड्यांचे रुट बदलले असून अयोध्येपासून १०० किलोमीटरवर असलेल्या बाराबंकी येथेच भाविकांना राहण्याचे आवाहन केले आहे. भाविकांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.

Protected Content