कोरोना : खामगाव येथे रस्त्यावर चित्र काढून कोरोनाबाबत जनजागृती

खामगाव (प्रतिनिधी)।  येथील शिवनेरी ग्रुप व शहर पोलीस स्टेशने स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने विविध स्लोगन शहरातील विविध ठिकाणावर रस्त्यावर लिहून कोरोना संबंधित चित्र काढून कोरणा बाबत जनजागृती केली पूर्ण पासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे याबाबत या चित्राद्वारे संदेश देण्यात आला आहे.

संपूर्ण देश सध्या कोरोनाव्हायरस च्या विळख्यात सापडला आहे याकरिता संपूर्ण देशवासीय या राक्षशी व्हायरसला संपवण्याच्या दृष्टीने लॉकडाउन मध्ये सहभागी झाले आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या आजाराला लढा देण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. या अनुषंगाने शहरातील शिवनेरी ग्रुप व शहर पोलीस स्टेशने स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने विविध स्लोगन शहरातील विविध ठिकाणावर रस्त्यावर लिहून कोरोना संबंधित चित्र काढून कोरणाबाबत जनजागृती केली. पूर्ण पासून बचावासाठी नागरिकांनी काय करावे याबाबत या चित्राद्वारे संदेश देण्यात आला आहे आजचा उपक्रम खामगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर चौकात करण्यात आला.

यावेळी खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अबुलकर शिवनेरी ग्रुपचे किशोर लोखंडे, रोहित माळवंदे, गोलू महंतो, ऋषिकेश कावणे, अभिषेक रोहनकार, संकेत सुराणा, रोशन वाघ, सुजित चव्हाण, सुनील गुळवे, गणेश महल्ले, पियुष अग्रवाल, पवनराजे डिंकर आदींसह मंडळाचे ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्स सिंग चे पालन संपूर्ण उपक्रमात करण्यात येत आहे.

Protected Content