डांभुर्णी प्रकरण : आरोपीला सहकार्य केल्याच्या गैरसमजीतून सरपंचांच्या घरात तोडफोड; गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी गावातील काल झालेल्या अल्पवयीन मुलाच्या हत्या झाल्याने संतप्त नागरिकांनी प्रथम ग्रामपंचायत व नंतर सरपंचांच्या घराची नासधूस करून तोडफोड केल्याचे प्रकार उघडकीस आले. यासंदर्भात डांभुर्णी ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी यावेळी पोलीस स्टेशनला अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभुर्णी गावात शुक्रवार  3 एप्रिल रोजी गावातील अल्पवयीन कैलास कोळी या मुलाचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. दरम्यान आज ४ एप्रिल रोजी यावल पोलिसांनी खुनातील संयशियित आरोपी यश पाटील कोळन्हावी शिवारातून अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दरम्यान काल सायंकाळी ७ ते ८ च्या दरम्यान गावातील संतप्त झालेल्या जमावाने एका गटाने प्रथम ग्रामपंचायतिची तोडफोड केली व नंतर जमावाने गावातील सरपंच पुरूजीत गणेश चौधरी यांच्या घरावर जाऊन त्यांच्या घराची तोडफोड करून संसारोपयोगी वस्तू टीव्ही फ्रीज आदि मुल्यवान वस्तुंची नासधूस करून सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली असून यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता सरपंच पुरूजीत चौधरी यांनी या खून या खुनातील संशयित आरोपीस काही महिन्यांपूर्वी अशाच एका गंभीर घटनेत सहकार्य केल्याचे प्रकार समोर आल्याने सरपंच विरुद्ध गावातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला याच पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी हे कृत्य केले असावे. याबाबत माहिती मिळाली असता गावातील सरपंच चौधरी यांनी हे घटना घडली त्यावेळेस आपल्या कुटुंबासह जळगाव येथे गेले होते, त्यांनी आज यावल पोलीस स्टेशनला येऊन संबंधित अज्ञात जमावकरणाऱ्यां च्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी सुमारे 30 ते 40 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण धनवडे सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार व पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content