यावल येथे काँग्रेसतर्फे खरेदी विक्री संघाच्या आवारात ध्वजारोहण

यावल प्रतिनिधी । भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने यावल येथील खरेदी विक्री केंद्राच्या आवारात गणतंत्र दिनी ध्वजारोहण तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्याहस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी माजी नगरसेवक तथा इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील, यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरूड, काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान, पक्षाचे मुख्य नोंदणीकर्ता अजय बढे , तालुका उपाध्यक्ष सतिष आबा पाटील , काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे , माजी नगरसेवक गुलाम रसुल हाजी गुलाम रसुल, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे , सेवा फाउंडेशनचे नईम शेख , शेख सकलेन, विक्की गजरे , अभिषेक इंगळे , विजय गजरे आदी कार्यकर्ते व पदधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

Protected Content