पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नंदकुमार शेलकर । महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून, पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आज १ मे रोजी सकाळी ८ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या ध्वजारोहण कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे, तहसीलदार विजय बनसोडे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश टाक, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार किशोर पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार किशोर पाटील यांनी याप्रसंगी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.