नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. नाशिक जिल्हयातील दिंडोरी मतदारसंघात मोदींची पहिली सभा होणार आहे. ही सभा पिपंळगाव कृषी उत्पन्न बाजारसमितीजवळ होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील या प्रदेशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकार विरोधात नाराजी असल्याची चर्चा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इशारा देणाऱ्या ठाकरे गटाच्या पाच शिवसैनिकांना निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले आहेत. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध कांदा उत्पादक संघटना यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.
महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा गाजलेला विषय, केंद्र सरकारने घेतलेले निर्णयात धोरणाचा निर्णय, त्यावर शेतकऱ्यांची असलेली या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होत आहे. कांदा प्रश्नावरुन शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात आंदोलनाची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही नोटीस दिली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनाही नोटीस दिली आहे. महायुतीच्या प्रचारार्थं नाशिकच्या पिंपळगाव येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी मोदी यांनी विविध भाषणात दिलेल्या आश्वासनाबाबत जाब विचारण्याचा इशारा देणाऱ्या पाच शिवसैनिकांना (उध्दव ठाकरे गट) निफाड पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञात स्थळी नजरकैदेत ठेवले. पोलीस वरिष्ठांच्या आदेशान्वये या पाच जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये मोंदीच्या सभेपूर्वी पोलिसांकडून ठाकरे गटाचे पाच शिवसैनिक नजरकैदेत
8 months ago
No Comments