जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पती-पत्नी व भावजई घराबाहेर उभे असताना बाजूला हसी मजाक करणाऱ्या तरुणांना त्याविषयी जाब विचारला असता एका जणाने राकेश गणपत भाट (वय-४५, रा. कंजरवाडा, जळगाव ) यांना पाईप मारला. तसेच त्यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवार ११ मे रोजी रात्री १०.३० वाजता कंजरवाडा परिसरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात १२ मे रोजी पहाटे ५ वाजता चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात राकेश भाट, त्यांची पत्नी सोनीबाई, भावजयी सपना नरेश भाट हे वास्तव्याला आहे. शनिवारी ११ मे रोजी रात्री १०.३० वाजता घराबाहेर उभे होते. त्यावेळी त्याच परिसरात राहणारे त्यांचे लंकेश जितेंद्र भाट, सोल्जर महेंद्र भाट, रितीक जोगेंद्र भाट, कृष्णा विष्णू भाट सर्व रा. कंजरवाडा हे सर्व हसी मजाक करत होते. त्यावेळी राकेश भाट याने हसी मजाक का करता असे विचारले. याचा राग आल्याने लंकेश भाटसह त्याच्या सोबत असलेल्या तिघांनी हातातील लोखंडी पाईपाने राकेश भाटसह त्यांच्या कुटुंबाला मारहाण केली. या मारहाणीत राकेश भाट, त्यांचे भाऊ राजेश गणपत भाट, नरेश गणपत भाट, आतीष नरेश भाट आणि सोनीबाई राकेश भाट हे सर्व जखमी झाले. याप्रकरणी रविवारी १२ मे रोजी पहाटे ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लंकेश जितेंद्र भाट, सोल्जर महेंद्र भाट, रितीक जोगेंद्र भाट, कृष्णा विष्णू भाट सर्व रा. कंजरवाडा हे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.