मांडवा दिगर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मांडवा दिगर येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना सोमवारी ६ मे रोजी सकाळी १० वाजता घडली आहे. याप्रकरणी चौकशी अंती अखेर रविवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील मांडवा दिगर गावातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा हा आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान सोमवार ६ मे रोजी सकाळी १० वाजता पीडित मुलगा हा घरी एकटा असताना त्याला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत त्याला पळून नेले आहे. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान अखेर त्याच्या पालकांनी रविवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलिसात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहे.

Protected Content