भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला हातातील लोखंडी वस्तूंने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शनिवारी ११ मे रोजी रात्री ८ वाजता घडली. याप्रकरणी रविवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दीपक सुरेश चऱ्हाटे वय-२७, रा. साकेगाव ता. भुसावळ हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला असून खाजगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी ११ मे रोजी रात्री ८ वाजता दीपक चऱ्हाटे हा घरी होता. त्यावेळी गावात उमाकांत राजेंद्र चौधरी आणि लोकेश अशोक कुरकुरे यांचे भांडण सुरू होते. हे पाहून ते भांडण सोडवण्यासाठी दीपक चऱ्हाटे यांनी मध्यस्थी केली. याचा राग आल्याने उमाकांत राजेंद्र चौधरी रा. साकेगाव ता.भुसावळ याने शिवीगाळ करत हातातील लोखंडी वस्तूने त्यांच्या छातीवर मारून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर दीपक चराटे यांनी रविवारी १२ मे रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दहा घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारा उमाकांत राजेंद्र चौधरी यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई हे करीत आहे.

Protected Content