जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील खोटे नगरजवळ कारला समोरील येणाऱ्या अज्ञात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार मधील ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, एरंडोल येथील माहेर असलेल्या प्रतीक्षा सचिन पाटील (वय- २५, रा. आयोध्यानगर) यांच्या आईची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षा यांच्यासह त्यांचे पती सचिन पाटील (वय-३५), मुलगा देवांश सचिन पाटील (वय अडीच वर्षे) तसेच प्रतीक्षा यांची बहीण नंदीनी पाटील (वय- १९), विनोद सोपान पाटील (वय- ४५) हे कारने रविवारी १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कारने एरंडोल येथे जाण्यासाठी निघाले होते. जळगाव शहरातील खोटेनगर जवळून जात असताना समोरून ओव्हरटेक करत येणाऱ्या चारचाकी वाहनाने कारला समोरून धडक दिली. त्यात कारमधील पाचही जण जखमी झाले. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघातात जखमी झालेल्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.