शेतातील बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातील घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २ लाख ५ हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश भरत परदेशी (वय-४०) रा. टाकळी ता. जामनेर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्याचे टाकळी शविारातील शेत गट नंतर १२/१ मध्ये शेत आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या शेतात त्यांनी घर बांधले आहे. २० मे रोजी रात्री १० वाजता सुरेश परदेशी यांनी शेतातील घर बंद करून घरी गेले होत. अज्ञात चोरट्यांनी शेतातील बंद घर फोडून घरातील कपाटात ठेवले ७० हजार रूपयांची रोकड आणि १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २ लाख ५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुरेश परदेशी यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहे.

 

Protected Content