प. वि. पाटील विद्यालयात ‘प्रथमोपचार’ मार्गदर्शन   

p.v.patil

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात आज दि. 7 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी प्रथमोपचार म्हणजे काय? कसा व केव्हा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेच्या आवारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी खाली पडणे, भाजणे, बुडणे, साप चावणे, जीव घाबरणे, रस्त्यावर झालेला अपघात अशा विविध प्रकारच्या घटनेतून शारीरिक इजा होऊन मोठे नुकसान होण्यापूर्वी म्हणजेच, अशा पीडित व्यक्तींना दवाखान्याची सुविधा उपलब्ध होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचा घरगुती उपाय केला पाहिजे याविषयी उपशिक्षक योगेश भालेराव यांनी एका सुंदर उपक्रमाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात इयत्ता 2री च्या विद्यार्थ्यांकडून स्वतःच्या घरासाठी एक छोटीशी प्रथमोपचार पेटी तयार करण्यात आली. त्यात कापूस, डेटॉल, जखमेसाठी लागणारे मलम, हायड्रोजन, कात्री, बँडेज पट्टी, विविध प्रकारच्या गोळ्या ठेवल्या व त्याविषयी व त्यांच्या वापराविषयी अचूक अशी माहिती देऊन त्याचा वापर कसा करावा हे प्रात्यक्षिक करु दाखविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. त्यांना सर्व विद्यार्थी व पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Protected Content