Home राजकीय राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर

0
30

बीड प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली असून यात बीडमधील पाच जागांचा समावेश आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असतांना अजून युतीचे गाडे अडलेलेच आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर करून यात आघाडी घेतली. राष्ट्रवादीने आज पाच उमेदवारांची घोषणा केली असून हे सर्व बीड जिल्ह्यातील आहेत. आज बीड येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी उमेदवार जाहीर केले. यात परळीतून धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगावातून माजी मंत्री प्रकाश सोळंके व केजमधून नमिता मुंदडा या उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसदेखील येत्या दोन दिवसांमध्ये आपली पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound