मुख्याध्यापकांनी तंबाखुमुक्त शाळेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करावे – विजय पवार

WhatsApp Image 2019 09 18 at 8.39.15 PM

रावेर, प्रतिनिधी | तंबाखुमुक्त शाळेच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करावे. व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी शाळांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी केले. ते तालुक्यातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांच्या ‘तंबाखू मुक्त शाळा’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या  कार्यशाळेचे  बुधवार १८ सप्टेंबर रोजी प्रकाश विद्यालय, वाघोदे येथे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शालेय पोषण आहार अधीक्षक अजित तडवी , केंद्र प्रमुख राजेंद्र सावखेडकर , मुख्याध्यापक पी. एल. नरवाडे , एन. व्ही. पाटील , बी. टी. सपकाळे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन विषय तज्ञ प्रफुल्ल मानकर यांनी केले.आभार मुख्याध्यापक बी टी सपकाळे यांनी मानले. तज्ञ मार्गदर्शक म्हणून आर. एम. बाविस्कर (सरदार जी जी हायस्कूल, रावेर), मुबारक शाह (जि. प. शाळा, मोरव्हाल), मनोहर पाटील (जि.प.शाळा, गौरखेडा )यांनी ‘तंबाखू मुक्त शाळा अभियान’ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अधीक्षक अजित तडवी यांनी सांगितले की , हे अभियान मनापासून राबविण्याचा संकल्प मुख्याध्यापक यांनी करावा .तसेच व्यसनमुक्तीबाबत शिबिरांचे आयोजन करावे. मुख्याध्यापक पी. एल. नरवाडे, एन. व्ही. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

Protected Content