जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/advt-1.jpg)
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी नेमकी कुणाकुणाला मिळणार याबाबत मोठ्या उत्सुकतेचे वातावरण लागून होते. आज भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यामध्ये ९९ मतदारसंघांचा समावेश आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहर, जामनेर, चाळीसगाव, रावेर, भुसावळ अशा पाच मतदारसंघांचा समावेश आहे.
भाजपच्या यादीत आज जामनेरातून ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जळगाव शहरातून विद्यमान आमदार राजूमामा भोळे, भुसावळमधून आमदार संजय सावकारे, चाळीसगावातुन आमदार मंगेश चव्हाण, रावेर-यावलमधून पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे या नावांचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाने कोणतीही रिस्क न घेता विद्यमान आमदारांसह अपेक्षित नावांनाच प्राधान्य दिल्याचे या यादीतून दिसून येत आहे. निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्याआधीच भाजपचे उमेदवारांची नावे जाहीर केल्याची बाब देखील लक्षणीय मानली जात आहे. तर कोणत्याही आमदाराचे तिकिट कापण्यात आलेले नसल्याने भाजपने जळगाव जिल्ह्यात सेफ खेळी केल्याचे दिसून येत आहे.