जळगावात गोळीबार : तरूणाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महापालिकेत अतिक्रमण काढण्याची तक्रार दिल्याच्या रागातून दोन जणांनी एकाला बेदम मारहाण करत बंदुकीने गोळी झाडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील जी.एस. मैदानावर रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील टॉवर चौक ते चौबे शाळेदरम्यान असलेल्या अतिक्रमण काढण्याबाबत भगवान काशिनाथ सोनार (वय-३९) रा. शिवाजी नगर, जळगाव यांनी जळगाव महापालिकेत तक्रार दिली होती. रविवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास जी.एस. मैदानाच्या मुख्य गेटजवळ भगवान सोनार याला पंकज ढेके याने महापालिकेत दिलेल्या तक्रारीच्या कारणावरून मारहाण केली. तर पंकज ढेके सोबत असलेला किरण खर्च याने त्याच्या हातातील बंदुकीने फायर केले. फायर केल्याचे पाहताच भगवान सोनार याने आरडाओरड करत एसबीआय बँकेच्या चौकाकडे पळत सुटला. त्यानंतर पंकज ढेके आणि किरण खर्चे यांनी त्याचा पाठलाग करत पुन्हा गोळीबार केला. अंधाराचा फायदा घेत दोन्ही पसार झाले. जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. याप्रकरणी सोमवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी भगवान सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पंकज ढेके आणि किरण खर्चो यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content