अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील एकलहरे गावातील शेत शिवारात शेत गट क्रमांक २३१ मधील शेतात अचानक लागलेल्या आगीत शेतातील ठिबक चन नद्यांच्या जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दीपक शालीग्राम पाटील वय-४७, रा. एकलहरे ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे अमळनेर तालुक्यातील एकलहरे शिवारातील शेत गट क्रमांक २३१ मध्ये शेत आहे. या शेतात त्यांनी ठिबक सिंचन पसरविले आहे. दरम्यान बुधवार २० मार्च रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या शेतातील ठिबक नळ्यांना अचानक आग लागली. या आगीत शेतातील ६० हजार रुपये किमतीचे ठिंबक निळ्या जळून खाक झाले आहे. हा प्रकार लक्षात शेतकरी दिपक पाटील यांनी मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवार २१ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शरीफ खान पठाण करीत आहे.