जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त अग्निशमन दलाचा सत्कार

जळगाव प्रतिनिधी । जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलात महापालिका अग्निशमन दल विभागात जावून अग्निशमन पथकातील प्रत्येक कर्मचारी यांच्याहस्ते महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला आहे. 

यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतूकही केले.  यावेळी कर्मचार्‍यांनी सद्यःस्थितीत या केंद्राकडे जुन्या ३ व नव्या ४ अशा एकूण ७ फायर फायटर गाड्या उपलब्ध असून, एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

याप्रसंगी केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.