Home Cities भुसावळ तीव्र उष्णतेने रेल्वे डब्यातील कोळशाला आग ( व्हिडीओ )

तीव्र उष्णतेने रेल्वे डब्यातील कोळशाला आग ( व्हिडीओ )

0
20

भुसावळ प्रतिनिधी । तीव्र उष्णतेमुळे भुसावळच्या रेल्वे यार्डात उभ्या असणार्‍या डब्यातील कोळशाला आग लागल्याची घटना आज घडली.

सध्या सर्वत्र तीव्र उष्णतेची लाट असून भुसावळात याचे भयंकर स्वरूप पहायला मिळत आहे. अन्य शहरांपेक्षा भुसावळात किमान एक-दोन अंशाने तापमान जास्त असते. यातच आज तीव्र तापमानामुळे रेल्वे यार्डात उभ्या असणार्‍या एका डब्यातील दगडी कोळशाला आग लागली. परिसरात काम करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना यातून धुर येतांना दिसल्याने त्यांनी लागलीच अग्नीशमन यंत्रणेला पाचारण केले. यामुळे काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान, या आगीची माहिती कर्मचार्‍यांना लागलीच मिळाल्याने पुढील अनर्थ टळला. अर्थात हा डबा यार्डात उभे असल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र जर चालत्या गाडीत असे घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे.

पहा : रेल्वे डब्यास लागलेल्या आगीचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound