आनोरे येथे जैन मुनी अक्षय सागरजी यांचे उदबोधन

amalaner

अमळनेर प्रतिनिधी । संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागरजी महाराज यांचे परम शिष्य अक्षयसागरजी महाराज यांनी तालुक्यातील आनोरे येथील ग्रामस्थांना अहिंसा व शाकाहार यांचा जीवनात होणारा सकारात्मक प्रभाव व व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर उदबोधन दिले.

मुनिश्रीनि सांगितले की, मांस भक्षण केल्याने 107 प्रकारचे रोग होतात व शाकाहार म्हणजेच शांती कारक व हानी रहित आहार होय. मुनींश्रीनि महाभारत, रामायण आणि संत तुकाराम महाराज यांचे संदर्भ देऊन शाकाहार व अहिंसा यांचे जीवनातील महत्त्व सांगितले. अहिंसा के द्वारा ही भारतीय संस्कृतीकी सुरक्षा हो सकती है और अहिंसा ही भारत की नीव है असा समाजहितोपदेश श्रीअक्षय सागर जी यांनी दिला. प्रथमच गावात जैन मुनी आल्याने ग्रामवासी अत्यंत हर्षोल्हासित होते. अनोरे गावात वाटर कप स्पर्धा उत्साहात सुरू असताना आज या स्पर्धे अंतर्गत हा कार्यक्रम करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शाकाहार व व्यसनमुक्त जीवन जगण्यात संकल्प घेतला. याप्रसंगी माजी जिल्हा परीषद सदस्य तथा शिरसाळे येथील जैन समाजाचे अध्यक्ष प्रकाश बाबूलाल जैन, नितीन भैय्या, प्रीतम जैन, दिलीप जैन, पवन जैन, अक्षय जैन, कल्पेश जैन, अतीत जैन, सागर जैन, भूषण जैन, नितीन जैन, वीरेंद्र जैन, अनिल जैन, ग्रामस्थ आनोरे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Add Comment

Protected Content