भीषण अग्नीतांडव : इमारतीला लागलेल्या आगीत २७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पश्चिम दिल्लीतील मुंडका मेट्रो स्थानकाजवळच्या एका इमारतीला काल संध्याकाळी भीषण आग लागली या आगीत २७ जणांचा मृत्यू झाला, तर १२ हून अधिक जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. या इमारतीत आणखी काही लोक अडकले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ही आग भीषण असून आतापर्यंत, आम्ही पहिल्या आणि दुसर्‍या मजल्यावरून २७ मृतदेह बाहेर काढले आहेत. सर्व मृतदेह ओळखण्यापलिकडे आहेत. यामुळे डीएनए चाचणीवरून याची ओळख पटविली जाणार आहे.

मुंडका स्थानकाजवळच्या या व्यावसायिक संकुलाच्या तीन मजली इमारतीला संध्याकाळी आग लागली. पहिल्या मजल्यावर प्रथम आगीचा भडका उडाला. त्यानंतर ती दुसर्‍या मजल्यावर पसरली.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: