धाबे येथे आदिवासी बांधवांच्या घराला आग लाखोंचे नुकसान.

पारोळा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी|प्रतिनिधी तालुक्यातील धरणगाव रस्त्यावरील पारोळ्यापासून चार ते पाच किलोमीटर अंतर असलेले धाबे येथील एका आदिवासी भिल्ल समाजाच्या बांधवाच्या घराला शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे रात्रीचे नुकसान झाल्याची घटना दि.११रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत धाबे गावातील अनिल हिरामण पवार यांचे घर दूध डेअरीला लागून असलेल्या मंदिराजवळ असल्याने ते रात्री जेवण करून दिवा लावून झोपलेले असतांना मंदिराची वायर झोपड्यावर पडल्याने अचानक आग लागल्यावर तात्काळ अनिल पवार व त्यांचे कुटुंब झोपेतून उठून बाहेर पळाल्याने जीवित हानी टळली मात्र घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये रोख जळून खाक झाले तर घरातील संसार उपयोगी वस्तू, कपडे, धान्य, भांडी, आदी जळून खाक झाले. रात्री पारोळा नगर पालिकेच्या अग्निशमन बंब चालक मनोज पाटील, जितेंद्र पाटील शेळावे यांच्यासह धाबे गावातील तरुणांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीचे रौद्र रूप घेतल्यामुळे सर्व घर जळून खाक झाले आणि गरिबाचा संसार उघडा झाला त्या गरीब कुटुंबाला शासनाकडून तात्काळ पंचनामा करून मदत मिळावी अशी मागणी अनिल पवार व गावातील नागरिकांनी केली आहे.

Protected Content