जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हॉटेल शिवरामनिवास इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर मंगळवारी (१८ मार्च) सायंकाळी ५ वाजता अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच जळगाव महापालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्यात सहभागी झाले आहेत.
आगीने इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणावर धुर निघत होते. आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. पोलीस कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सहभागी झाले होते. परिसरातील नागरिकांनीही अग्निशमन दल आणि पोलिसांना मदत केली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक माहितीमध्ये समोर आले आहे.