शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे गोत्यात : गुन्हा दाखल

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे तथा शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यावर रात्री उशीरा पीडित तरूणीला धमकावण्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतण्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली होती. त्याच केदार दिघे यांना उध्दव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुखपदाची मोठी जबाबदारी देऊन त्यांना पाठबळ दिले होते. तथापि, आता केदार दिघे हे गोत्यात आल्याचे दिसून येत आहेत.

चप्त माहितीनुसार, एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशन मध्ये केदार दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे आणि त्यांचा मित्र अशा दोन व्यक्तींविरोधात बलात्कार आणि धमकी दिलेल्या प्रकरणात पीडित महिले कडून तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. यात दिघे यांचा मित्र रोहित कपूर विरोधात बलात्कार तर दिघेंच्या विरोधात धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content