Home राजकीय जाणून घ्या ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणते मोठे बदल झाले

जाणून घ्या ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणते मोठे बदल झाले


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये राज्य सरकारच्या वतीने महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. 21 वर्षांपासून 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अडीच लाख रुपयांपर्यंतच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळणार आहेत. यामध्ये पाच एकर जमिनीची अट टाकण्यात आली होती. ती अट देखील आता रद्द करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले.

एक जुलैपासून ही योजना लागू झाली असून योजनेत अर्ज करण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. या साठी दिवसाच्या कालावधीत ज्या महिला अर्ज करतील, त्या महिलांनी एक जुलैला अर्ज केला आहे असे समजून दोन्ही महिन्याचे पेमेंट मिळणार आहे. तर ऑगस्ट महिन्यानंतर ज्या महिला अर्ज करतील, त्यांनी अर्ज केलेल्या दिनांक पासून त्यांना पैसे मिळतील. अशा प्रकारच्या निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

डोमिसाईलचा दाखला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तरी या संदर्भात त्या महिलेच्या पतीकडे जर राज्यातील जन्माचा दाखला असेल तर ते देखील या योजनेसाठी चालणार आहे. किंवा पंधरा वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे रेशन कार्ड किंवा निवडणुकीत मतदान यादी मध्ये त्यांचे नाव असेल तर ते देखील चालणार आहे. ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड आहे, त्यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखल देण्याची अट काढून टाकण्यात आली असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound