ब्रेकींग : अखेर भुसावळच्या प्रांताधिकार्‍यांच्या निलंबनाचे निघाले आदेश

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील आणि संजय सावकारे यांना राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासानुसार आज प्रांताधिकार्‍यांच्या निलंबानाचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.

भुसावळचे प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या गैरकारभाराचा मुद्दा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच गाजला होता. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे या दोघांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड तालुक्यातील जलचक्र येथील अवैध उत्खननाबाबत प्रांताधिकार्‍यांच्या कार्यद्धत्तीविषयी आक्षेप घेत तक्रारी नोंदवल्या होत्या, शेती प्रयोजनासाठी जागा असताना तेथे गौण खनिजाची उत्खननाला परवानगी देण्यात आली. तसेच त्यानंतर तेथेच दंडात्मक कारवाई करण्यात आली व नंतर पुन्हा उत्खनन केल्यानंतर दंडाला स्टे देण्यात आल्याचा प्रकार प्रांताधिकार्‍यांनी केला होता. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

यासोबत, भुसावळातील आमदार संजय सावकारे यांनी वेल्हाळे येथील आदिवासी जमिनीचे हस्तांतरणाचे अधिकार नसताना प्रांताधिकार्यांनी अधिकाराचे उल्लंघण केल्याची तक्रार केली होती. तसेच, शहरातील मेसॉॅनिक लॉज ही जागा कुळ कायद्यात बसत नसताना हस्तांतरणाची परवानगी प्रांताधिकार्‍यांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासोबत, भुसावळातील पारशी समाजाच्या जागेचा हस्तांतरणाचा प्रयत्न सुरू असून त्याबाब ज्यांनी कुणी व्यवहार केला असल्यास सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. या जागेतही गैरप्रकार होण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे.

या दोन्ही आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी करून प्रांताधिकारी सुलाणे यांना निलंबित करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली होती. २१मार्च रोजी निलंबनाची घोषणा करण्यात आल्यानंतर प्रांताधिकारी सुलाणे यांनी नियमित कामकाज सुरू करून देखील काहीही कार्यवाही होत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. अखेर आज प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निलंबीत करण्यात आले असून या संदर्भातील शासकीय आदेश महसूल खात्याचे अवर सचिव संजय राणे यांनी जारी केले आहेत. या निलंबनाच्या आदेशात सुलाणे यांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालया रिपोर्टींग करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

Protected Content