अखेर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार : यांची लागणार वर्णी

uddha 1574608405 618x347

मुंबई, वृत्तसंस्था | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. उद्या, सोमवारी उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सरकारमध्ये सामिल असलेल्या तिन्ही पक्षातील राज्यातील विविध भागातील नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरला राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशनही पार पडले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात झालेला नाही. सुरुवातीला केवळ मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे तसेच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या सरकारमधील तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र, एका वृत्तानुसार, उद्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. तसेच मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य नेत्यांच्या नावाची यादीही समोर आल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

यामध्ये शिवसेनेचे १३ नेते, राष्ट्रवादीचे १३ नेते तर काँग्रेसचे १० नेते उद्या मंत्रीपदाची शपथ घेतील. या विस्ताराद्वारे मंत्रिमंडळातील सर्व खाती भरण्यात येणार असल्याचे कळते. यामध्ये शिवसेनेचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, राष्ट्रवादीचे १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट तर २ राज्यमंत्री असतील.

शिवसेना –
मुंबई – अनिल परब, रविंद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत
कोकण- उदय सामंत, भास्कर जाधव, वैभव नाईक
पश्चिम महाराष्ट्र – संभुराजे देसाई, प्रकाश अबिटकर
मराठवाडा – संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत
विदर्भ – आशिष जैसवाल, संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड
ठाणे -प्रताप सरनाईक
उत्तर महाराष्ट्र – गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे

राष्ट्रवादी काँग्रेस –
पश्चिम महाराष्ट्र- अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, दत्ता भरणे
विदर्भ – अनिल देशमुख
ठाणे – जितेंद्र आव्हाड
मुंबई – नवाब मलिक
मराठवाडा- धनंजय मुंडे, राजेश टोपे, डॉ. राजेंद्र शिंगणे
कोकण- आदिती तटकरे
उत्तर महाराष्ट्र- डॉ. किरण लहामटे

काँग्रेस –
उत्तर महाराष्ट्र – के. सी. पाडवी
मराठवाडा – अशोक चव्हाण, अमित देशमुख
पश्चिम महाराष्ट्र – सतेज पाटील, विश्वजीत कदम
विदर्भ- विजय वड्डेटीवार
मुंबई- वर्षा गायकवाड किंवा अमिन पटेल

Protected Content