यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसापासुन वादाच्या गोंधळात सापडलेल्या तालुक्यातील बोरखेडा खुर्दच्या ग्रामसेविका रजिया तडवी यांची अखेर बदली करून त्यांच्या ठिकाणी बोरखेडा खुर्दच्या ग्रामसेवक पदावर राजु तडवी यांची तर प्रशासकीय आदेशाने मालोद तालुका यावल ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक म्हणून रजिया तडवी यांची तात्पुरत्या स्वरूपात नेमणुक करण्यात आली असल्याचे आदेश गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांनी काढले आहेत.
या संदर्भात बोरखेडा खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच अकीला जहांगीर तडवी व उपसरपंच इकबाल बाबु तडवी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक १ जानेवारी २०२४ रोजी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांची भेट घेऊन बोरखेडा खुर्द येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेविका रजिया दगडु तडवी यांच्या विरुद्ध असलेल्या अनेक तक्रारीचा पाढा वाचला व अशा ग्रामसेविकेची आमच्या गावातून तात्काळ बदली करावी अशी मागणी केली व या संदर्भात निर्णय होईपर्यंत आपण पंचायत समिती कार्यालय सोडणार नाही असा हठ्ठ धरल्याने अखेर गटविकास अधिकारी यांनी तत्काळ ग्रामसेविका रजिया तडवी यांची प्रशासकीय कामकाजात लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेणे उडवा उडवीचे उतरे देणे असा लेखी तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांच्याकडून बोरखेडा ग्रामपंचायतचे पदभार काढून त्यांची तात्पुरत्या स्वरूपात मालोद ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक म्हणुन नेमणुक करण्यात आली आहे . दरम्यान ग्रामसेविका रजिया तडवी यांच्या ठिकाणी बोरखेडा ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक पदावर राजु अनवर तडवी यांची नेमणुक करण्यात आली आहे .