यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझीरा या गावात पोळ्याचे बैल अंघोळीस गेलेल्या एका चा खदानात बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की, राजु नबाब तडवी (वय ४० वर्ष रा. वाघझिरा ता. यावल) हा मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती दिनांक २ सप्टेंबर पोळ्याच्या दिवसी वाघझिरा शिवारातील चैनसिंग खजान बारेला यांच्या शेतातील खदानीच्या पाण्यात गावातील नागरीक बैलांना अंघोळीसाठी घेऊन जातात. राजु तडवी हा देखील त्याच्याकडील बैलांची अंघोळ झाल्यावर बैलांना हाकलून बाहेर काढत असतांना त्याचा पाय घसरून तो खदानीत जााऊन पडला असता गावातील मंडळीने राजु तडवी यास खदानीतून दोरीच्या साहाय्याने त्यास बाहेर काढले व तात्काळ त्यास एका खाजगी वाहनाने किनगाव येथील रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात त्या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी यांनी राजु तडवी यांची तपासणीस करीत त्यास मृत घोषीत केले. या बाबत मयत राजु तडवी यांचे मामा अकबर बाबु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे .