अखेर विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीस प्रारंभ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेस पक्षाने घेतलेला आक्षेप फेटाळून लावण्यात आला असून आता मतमोजणी सुरू झाली आहे.

 

आज सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपतर्फे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या अन्य आमदारांच्या उपस्थितीत व त्यांच्या मदतीने मतदान केल्याचे कॉंग्रेसने म्हटले असून ही दोन मते रद्द करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली. आधी राज्य तर नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कॉंग्रेस पक्षाने केलेली तक्रार ही फेटाळून लावलेली आहे. यामुळे आता   मतमोजणी सुरू झाली आहे.

 

येत्या काही मिनिटांमध्ये निवडणुकीतील प्राथमिक कल समोर येणार असून लागलीच निकाल येणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

Protected Content