अखेर बोगद्यात अडकेलेले सर्व ४१ कामगार सुरक्षीतपणे बाहेर !

उत्तरकाशी-वृत्तसंस्था | उत्तराखंडातील बोगद्यात तब्बल १७ दिवसांपासून अडकून पडलेल्या ४१ कामगारांना आज अखेर सुरक्षीतपणे बाहेर काढण्यात आले आहे. आज रात्री हे ऑपरेशन पार पडले.

उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये दिवाळीच्या दिवशी झालेल्या अपघातामुळे ४१ कामगार अडकून पडले होते. या कामगारांची अखेर १७ दिवसांनी सुटका झाली आहे. त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

दिवाळीच्या दिवशी पहाटे दुर्घटना झाल्यामुळे कामगार अडकून पडल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यासाठी विदेश तज्ज्ञांची मदत देखील घेण्यात आली होती. त्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते, पण या कामात विविध अडथळे येत होते. मजूरांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व बाजुंनी खोदकाम सुरु होते. ऑगर मशिन आपल्या कामात अपयशी ठरली होती. त्यानंतर रॅट मायनर्सला पाचारण करण्यात आले. त्यांच्याच मदतीने कामगारांपर्यंत पोहचणे शक्य झाले.

आज दुपारपासूनच एनडीआरएफच्या पथकाने रेस्न्यू ऑपरेशन सुरू झाले. यात पहिल्यांदा अनेक अडचणी आल्या. तथापि, ८०० मिलीमिटर व्यासाचे भोक पाडण्यात आले. यातून सर्व कामगारांना सुरक्षीतपणे काढण्यात आले. रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले. या सर्वांना पहिल्यांदा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Protected Content