देशातील २६ कंपन्यांचे लवकरच खासगीकरण : माहिती अधिकारातून गौप्यस्फोट

नवी दिल्ली । केंद्र सरकार लवकरच २६ सरकारी कंपन्यांचे खासगीकरण करणार असल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

२७ जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकार जवळपास २३ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत असल्याचे जाहीर केले होते. याबाबत सरकारने या कंपन्यांविषयी सविस्तर कोणतीही माहिती दिली नव्हती. पण, माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीवरून याबाबतचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

केंद्र सरकार या कंपन्यांचे किती टक्के शेअर विकून खासगीकरण करणार आहे, अशी विचारणा दाखल केलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जात करण्यात आली होती. तसेच युको बँकेचे खासगीकरण होणार आहे का? असेही विचारण्यात आले होते. यावर सरकारने किती शेअर विकायचे हे बाजारावर अवलंबून आहे आणि युको बँकेच्या खासगीकरणाबाबत कोणतीही माहिती नाही, असे उत्तर दिले.

खासगीकरण करण्यात येणार्‍या कंपन्यांची नावे

१. प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड

२. इंजिनियरिंग प्रोजेक्ट इंडिया लिमिटेड

३ पवन हंस लिमिटेड

४. बी अँड आर कंपनी लिमिटेड

५. एअर इंडिया

६. सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

७. सिमेंट कॉरपोरेशन इंडिया लिमिटेड (नयागांव यूनिट)

८ . इंडियन मेडिसिन अँड फार्मासिटिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड

९. सलेम स्टील प्लांट,

१०.फेर्रो स्करकप निगम लिमिटेड

११.नगरनार स्टील प्लांट ऑफ एन. डी. एम. सी.

१२.भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड

१३. एचएलएल लाईफ केअर

१४. भारत पॅट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड

१५. शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

१६. कंटेनर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

१७. नीलांचल इस्पात निगम लिमिटेड

१८. हिंदुस्तान प्रीफैब लिमिटेड

१९. भारत पंप अँड कंप्रेसर लिमिटेड

२०. स्कूटर इंडिया लिमिटेड

२१. हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड

२२. कर्नाटका एंटीबायोटिक अँड फार्मासिटिकल्स लिमिटेड

२३. बंगाल केमिकल्स अँड फार्मासिटिकल्स लिमिटेड

२४. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड

२५. इंडियन टुरिजम डेव्हलपमेंट कॉरपोरेशन

२६. हिंदुस्तान फ्लोरोकार्बंस लिमिटेड

केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत सर्व क्षेत्रे खासगीकरणासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी जुलै महिन्यात दिली होती. यानंतर आता यातील २६ कंपन्यांची नावे समोर आली आहेत.

Protected Content