जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनीतून १२ हजार रुपये किंमतीचे भंगार चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीत श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनी आहे. या कंपनी आवारात भंगार सामान तोडताड करुन ठेवलेला होता. ११ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदरचा १२ हजार रुपये किंमतीचा सामान चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय श्रीरामधनी यादव (वय ३८) यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील हे करीत आहेत.