वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदी पात्रातून बेकायदेशी वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविले असता चालकाने सरकारी कामा अडथळा निर्माण करून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीसात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील निंभोरा गावाजवळील गिरणा नदी पात्रातून बेकायदेशीररित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाचे तलाठी पाशा अजीज हलकारे यांच्यासह पथकाने १५ मे रोजी पहाटे ३ वाजता निंभोरा गावाजवळ वाळूने भरलेले ट्रक्टर पकडले. दरम्यान टॅक्टर चालकान ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालयात जमा न करता ट्रॅक्टर घेवून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तलाठी पाशा हलकारे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक सचिन राजेंद्र जाधव (पाटील) रा. कोठली ता. भडगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी करीत आहे

 

Protected Content