तरूणाला शिवीगाळ करून फायटरने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हनुमान मंदीर चौकात तरूणाचा रस्ता आडवित फायटरने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील शंकरराव नगरातील महेश उर्फ मुकेश राजू निंबाळकर (वय-२४) हा मजूरी करुन उदनिर्वाह करतो. शुक्रवारी १ एप्रिल रोजी रात्री तो चौघुले प्लॉट परिसरात राहत असलेल्या त्याच्या आत्याकडे जेवणासाठी जात होता. याचवेळी हनुमान मंदिराच्या चौकात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या व गोलू परदेशी (पुर्ण नाव माहित नाही) हे दोघ भेटले. “सध्या तु खुप हवेत उडत आहे” असे म्हणत ते महेशला शिवीगाळ करु लागले. दरम्यान, त्या दोघांना महेश समजविण्यासाठी गेला असता, गोलू परदेशी याने महेशला पकडून ठेवले तर राकेश याने त्याच्या  हातातील फायटरने चेहर्‍यावर व कपाळावर मारुन दुखापत करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी महेश निंबाळकर याने दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात राकेश साळुंखे उर्फ लिंबू राक्या, गोलू परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content