भरधाव कारने धडक दिल्याने महिला सायकलस्वार जखमी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी मुंबई – पंढरपूर सायकलिंग स्पर्धेसाठी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे बाजूने सर्व्हिस रोडवर प्रशिक्षण घेत असताना एका महिला सायकलस्वार जखमी झाली आहे. रविवारी सकाळी एका वेगवाने कारने धडक दिल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. ही घटना सकाळी 6.30 च्या सुमारास गोदरेज सिग्नल सर्व्हिस रोडजवळ घडली आहे. महिला ऐरोली जंक्शन आणि घाटकोपर दरम्यानच्या रस्त्यावर सायकल चालवत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिका बोरकर असं जखमी झालेले महिलेचे नाव आहे. कारच्या धडकेत अनिताला तळहाताला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर ईईएच रनर्स ग्रुपने मुंबई वाहतूक पोलिसांना पत्र लिहले आहे की, धावपटू आणि बेपर्वा चालकांपासून सायकलस्वारांच्या सुरक्षेसाठी सर्व्हिस रोडवर बॅरिकेडिंग करण्याची विनंती केली. स्थानिक पोलिसांनी बोरकर यांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलिसांनी बोरकर यांना सांगितले की, यात तुमचा वेळ वाया जाईल आणि कोर्टात फिऱ्या माराव्या लागतील.

अनिका बोरकर यांना धडक देणारा चालक मद्यधुंद अवस्थेत असून कार चालवत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी ड्रायव्हरशी सेटलमेट केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला होता. पत्रात सायकलस्वारांनी आपल्या सुरक्षतेसाठी मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून न घेतल्याने सायकलस्वारांनी संताप व्यक्त केला आहे.

Protected Content